Search This Blog

Thursday, December 12, 2019

लिंगनिश्चिंती... चूक कुणाची??

         मी एका खेडेगावात राहतो. खेड्याकळे चला या म्हणीप्रमाणेच खेड्यातील येडे ही म्हणही आता खोटी ठरत आहे. बहुतेकांनी आता शिक्षणाचा मार्ग अवलंबवला आहे. पण अजूनही काही फक्त शिक्षीतच आहेत, सुशिक्षित नाहीत. 
       गावात असाच काहीसा अनुभव मला आला. फेरफटका मारताना एक तिसीतला तरुण एका स्त्रीला मारताना मला दिसला. ती बहुतेक त्याची पत्नी असावी. तिला मारत असतांना तो खूप घाणेरड्या शिव्या देत होता. त्यांच्याजवळच एक पाच वर्षांची मुलगी आणि एक तीन वर्षांची मुलगी रडत होते. मोठ्या मुलीच्या मांडीवर एक गोंडस बाळ होते. बहुतेक तीही मुलगीच असावी. लोकांनी त्याला मारण्यापासून अडवले तेव्हा तो घाणेरड्या शिव्या देत निघून गेला. आणखी विचारपूस केली असता कळाले की त्यांना मुलगा होत नाही म्हणून तो पत्नीला मारत होता. हे ऐकून काळजात एकदम चर्र.. झालं आणि मनात विचार आले की त्या स्त्रीची त्यात काय चूक आहे. का तीने या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री म्हणून जन्म घेतला ही तीची चूक आहे? अरे शालेय जीवनापासून आपल्याला स्त्रि पुरुष समानतेचे धडे दिले जातात. नववी दहावीतच बाळाची लिंगनिश्चिती कशी होते हे घोकून घोकून पाठ केल्या जाते.
         त्यात पुरुषाकडे X आणि Y या गुणसूत्राची जोडी असते तर स्त्रीकडे X आणि X या गुणसूत्राची जोडी असते. जर स्त्रीचे X आणि पुरुषाचे Y गुणसूत्र एकत्र आले तर बाळ मुलगा असतो. आणि जर स्त्रीचे X आणि पुरुषाचे X गुणसूत्र एकत्र आले तर बाळ मुलगी असते. हे सर्व माहीत असून मुलगा होत नाही म्हणून स्त्रीला दोषी ठरवण ही किती मोठी शोकांतिका आहे. या लिंगनिश्चिंतिच्या प्रकियेत स्त्री किंवा पुरुषाला कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे कोणालाही दोषी ठरवता येत नाही.
          हे सर्व माहीत असून जर पुरुष स्त्रीला दोषी ठरवत असेल तर त्याला सांगावसं वाटते की अरे बाबा यात चूक तुझीच आहे. गुणसूत्राच्या जोडीमध्ये वेगवेगळी गुणसूत्रे तुझ्याकडे आहेत. मुलगा किंवा मुलगी होणं हे त्याझ्यावरच अवलंबून आहे. 
        मित्रानो आशा प्रकारच्या घटनांमुळे मुलींमध्ये नवीन संसाराचे स्वप्न रंगावण्याऐवजी भीती निर्माण होते, की आपल्याही बाबतीत असंच घडलं तर???????
       आता हळूहळू सामाजिक संघटनांच्या साहाय्याने हे चित्र बदलताना दिसत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण अजूनही खेड्यातच नव्हे तर शहरात सुध्दा अशा मानसिकतेची लोकं आहेत. त्यांची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment

माह्या गावची जत्रा (वर्हाडी कविता)

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात वानखेड तालुका संग्रामपूर ह्या गावात जगदंबा मातेची यात्रा पौष पौर्णिमेला असते. त्या यात्रेचे थोडक्यात वर्हाडी भ...