Search This Blog

Wednesday, February 19, 2020

माह्या गावची जत्रा (वर्हाडी कविता)

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात वानखेड तालुका संग्रामपूर ह्या गावात जगदंबा मातेची यात्रा पौष पौर्णिमेला असते. त्या यात्रेचे थोडक्यात वर्हाडी भाषेत वर्णन


🙏🎂माह्या गावची जत्रा🙏🙏
काय सांगू राजा तुम्हाले माह्या गावचं कौतुक
यात्रेची सुरुवात करते ती जगदंबेची मिरवणूक
डफळे-मृदुंग, लेझीम-पावली गाव दणाणून जाते राजा
त्या डीजे-डॉल्बीत बी नाही अशी मजा
सासरहून माहेरी जाते माझी जगदंबा आई
अशी न्यारी प्रथा साऱ्या जगात नाही
रात्री निघतात सोंगं रामायणावाणी
त्या रात्री सारी रात झपत नाही कोणी
राम, लक्ष्मण, सीता अन असते रामायण सारं
थंडी जाते पवून अन आंगात भरते वार
दहीहंडीची त राजा मजाच न्यारी
थरावर थर लावण्यासाठी पोरं जमतात सारी
भंडारा होते शिस्तीत करत नाही कोणी घाई
त्या उरदाच्या दाईची चव फाईव्ह स्टार मध्ये नाही
कितीबी असो दरवर्षी थंडीची लाट
तरीबी पायतात पंचक्रोशीत पौष पौर्णिमेची वाट
माह्या गावच्या जत्रेत एकदा तरी येजा
जगदंबा मातेचा सोहळा डोये भरून पायजा
                                  अंकुश रौंदळे
                                     वानखेड

Thursday, December 12, 2019

लिंगनिश्चिंती... चूक कुणाची??

         मी एका खेडेगावात राहतो. खेड्याकळे चला या म्हणीप्रमाणेच खेड्यातील येडे ही म्हणही आता खोटी ठरत आहे. बहुतेकांनी आता शिक्षणाचा मार्ग अवलंबवला आहे. पण अजूनही काही फक्त शिक्षीतच आहेत, सुशिक्षित नाहीत. 
       गावात असाच काहीसा अनुभव मला आला. फेरफटका मारताना एक तिसीतला तरुण एका स्त्रीला मारताना मला दिसला. ती बहुतेक त्याची पत्नी असावी. तिला मारत असतांना तो खूप घाणेरड्या शिव्या देत होता. त्यांच्याजवळच एक पाच वर्षांची मुलगी आणि एक तीन वर्षांची मुलगी रडत होते. मोठ्या मुलीच्या मांडीवर एक गोंडस बाळ होते. बहुतेक तीही मुलगीच असावी. लोकांनी त्याला मारण्यापासून अडवले तेव्हा तो घाणेरड्या शिव्या देत निघून गेला. आणखी विचारपूस केली असता कळाले की त्यांना मुलगा होत नाही म्हणून तो पत्नीला मारत होता. हे ऐकून काळजात एकदम चर्र.. झालं आणि मनात विचार आले की त्या स्त्रीची त्यात काय चूक आहे. का तीने या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री म्हणून जन्म घेतला ही तीची चूक आहे? अरे शालेय जीवनापासून आपल्याला स्त्रि पुरुष समानतेचे धडे दिले जातात. नववी दहावीतच बाळाची लिंगनिश्चिती कशी होते हे घोकून घोकून पाठ केल्या जाते.
         त्यात पुरुषाकडे X आणि Y या गुणसूत्राची जोडी असते तर स्त्रीकडे X आणि X या गुणसूत्राची जोडी असते. जर स्त्रीचे X आणि पुरुषाचे Y गुणसूत्र एकत्र आले तर बाळ मुलगा असतो. आणि जर स्त्रीचे X आणि पुरुषाचे X गुणसूत्र एकत्र आले तर बाळ मुलगी असते. हे सर्व माहीत असून मुलगा होत नाही म्हणून स्त्रीला दोषी ठरवण ही किती मोठी शोकांतिका आहे. या लिंगनिश्चिंतिच्या प्रकियेत स्त्री किंवा पुरुषाला कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे कोणालाही दोषी ठरवता येत नाही.
          हे सर्व माहीत असून जर पुरुष स्त्रीला दोषी ठरवत असेल तर त्याला सांगावसं वाटते की अरे बाबा यात चूक तुझीच आहे. गुणसूत्राच्या जोडीमध्ये वेगवेगळी गुणसूत्रे तुझ्याकडे आहेत. मुलगा किंवा मुलगी होणं हे त्याझ्यावरच अवलंबून आहे. 
        मित्रानो आशा प्रकारच्या घटनांमुळे मुलींमध्ये नवीन संसाराचे स्वप्न रंगावण्याऐवजी भीती निर्माण होते, की आपल्याही बाबतीत असंच घडलं तर???????
       आता हळूहळू सामाजिक संघटनांच्या साहाय्याने हे चित्र बदलताना दिसत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण अजूनही खेड्यातच नव्हे तर शहरात सुध्दा अशा मानसिकतेची लोकं आहेत. त्यांची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

Wednesday, December 11, 2019

प्रेम करावस वाटतं?

का आज मलाही
प्रेम करावसं वाटतं?
मागच्या बेंचवर बसून
तीला बघत बसावसं वाटतं.
तीच्या एका स्माईलसाठी
वेडं व्हावस वाटत
का आज मलाही
प्रेम करावस वाटतं?

लपून छपून कधीतरी,
बोगेत बोलवावसं वाटतं.
हातात हात घेत,
स्वप्न रंगवावसं वाटतं
का आज मलाही
प्रेम करावस वाटतं?

                          अंकुशकुमार

Monday, December 9, 2019

चंद्रावर झेप घेतांना.....

        काही दिवसांपूर्वी इस्त्रोने चंद्रायान 2 प्रक्षेपित केले. त्यामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर चा संपर्क तुटला. ती घटना एका कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

इस्रोच्या वैज्ञानिकांना मैत्री करायची होती चंद्राशी

तिथेही दाखवायची होती किमया विज्ञानाची

झेपावलं चांद्रयान हेच स्वप्न बाळगून उराशी

त्या पांढऱ्याशुभ्र सुंदर दिसणाऱ्या चंद्राकडे.

निघालं पृथ्वी आणि चंद्रालाही घिरट्या घालत ध्येयाकडे

 मायदेशी मात्र बघत होते डोळ्यात प्राण ओतून बदलणाऱ्या आकड्यांकडे

हळूहळू चंद्र जवळ येऊ लागला आणि वेगही मंदावला क्षणाक्षणाला

इतक्यात कळलं पोहोचलं चंद्रयान शेवटच्या टप्प्याला

आमच्यामध्ये आनंद संचारला, साजरी केली दिवाळी

पण अचानक, चंद्रयेवजी आनंदालाच ग्रहण लागलं

सर्व स्तब्ध झाले अन् आकडेही थांबले

कदाचित विक्रमही चंद्राच्या सौंदर्यावर भाळले असेल,

त्यामुळेच की काय त्याने मायदेशाशी संपर्क तोडला असेल,

मायदेशाशी संपर्क तोडला असेल...........
                     
                                            अंकुश कुमार रौंदळे
                           aroundales@gmail.com

Tuesday, October 8, 2019

पासवर्ड हॅक झालाय?????.....


    आजच्या या डिजिटल युगात प्रत्येक ठिकाणी aacount तयार करून त्यावर पासवर्ड ठेवावा लागतो. त्यात जीमेल, फेसबूक, इंटरनेट बँकिंग आणि इतरही. पण विचार करा जर आपला पासवर्ड हॅक झाला आणि आपली सर्व गोपनीय माहिती चोरीला गेली तर...
 याच विषयावर आज मी तुमच्याशी बोलणार आहे. म्हणजे इतरांचा पासवर्ड कसा हॅक करावा ह्यापेक्षा आपला पासवर्ड यापासून कसा वाचवावा हे महत्त्वाचं आहे.
    आजकाल इंटरनेट वर surffing करताना ऑर्कुट वर बरेचदा स्क्रॅप्स येतात , ज्यावर लिहिलं असतं की तुम्हाला फ्री मेसेजेस, फ्री सिम कार्ड, मेल वाचायला पैसे देउ वगैरे वगैरे कमिटमेंट्स असतात. त्या स्क्रॅप मधेच बरेचदा लिंक्स दिलेल्या असतात किंवा एखादे चित्र देऊन त्यावर हायपर लिंक दिलेली असते. तुम्ही च्या चित्रावर नकळत जरी क्लिक केले तरीही ती लिंक रन होते.
   बरेचदा whatapp वर मित्रांकडून फ्री गिफ्ट वगैरे चे मेसेजेस येतात त्यावर क्लीक केल्यावर आपल्याला पण तो मेसेज इतरांना शेअर करावा लागतो. त्यात पुन्हा खूप सारे टास्क दिलेले असतात जेकि कधीही पूर्ण होत नाहीत. पण आपण जेव्हा ह्या लिंक वर क्लीक करतो तेव्हा त्यात दिलेली स्क्रिप्ट ही रन झालेली असते. आणि तुमच्या नकळत त्या स्क्रिप्ट द्वारे तुमच्या ब्राउझरवरची माहिती गोळा करणे सुरु केलेले असते. थोडक्यात तुमच्या कॉम्प्युटर वर आता जे काही कराल ते त्या हॅकरला समजणे सुरु  होते. आणि त्या लिंकचा हाच नेमका हेतू असतो- तुम्हाला ती फ्री गोष्ट देणे हा नाही.
     आशा प्रकारच्या जवळपास सर्वच लिंक्स ह्या तुमचा डेटा गोळा करण्यासाठी असतात. ह्यात फक्त जीमेल चाच नव्हे तर तुमच्या कीबोर्ड वरील स्ट्रोक्स मोजून इंटरनेट बँकिंग आणि जवळपास सर्वच पासवर्ड हॅक केले जातात आणि तुमच्या privacy ला धोका निर्माण होतो.

 सुरक्षेसाठी काय करावं...
     सर्वात महत्वाचं अश्या प्रकारच्या कुठल्याही स्क्रिप्टस वर क्लीक करू नका ज्यामध्ये फ्री recharge, फोन , गिफ्ट कार्ड्स किंवा अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी देण्याचं म्हटलेलं असतं. लक्षात ठेवा या जगात कुठलीही गोष्ट फ्री मिळत नाही त्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारची किंमत मोजवीच लागते.
 आपला पासवर्ड ठेवतांना शक्यतो अल्फा न्युमरीक आणि सिम्बॉल वापरलेला असावा. उदाहरणार्थ Xyz$@789&Rst
शक्य झाल्यास त्यात मराठी किंवा इतर फॉन्ट वापरा कारण असे पासवर्ड हॅक करण कठीण असतं
पण अशक्य नाही. 

माह्या गावची जत्रा (वर्हाडी कविता)

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात वानखेड तालुका संग्रामपूर ह्या गावात जगदंबा मातेची यात्रा पौष पौर्णिमेला असते. त्या यात्रेचे थोडक्यात वर्हाडी भ...