Search This Blog

Monday, December 9, 2019

चंद्रावर झेप घेतांना.....

        काही दिवसांपूर्वी इस्त्रोने चंद्रायान 2 प्रक्षेपित केले. त्यामध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर चा संपर्क तुटला. ती घटना एका कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

इस्रोच्या वैज्ञानिकांना मैत्री करायची होती चंद्राशी

तिथेही दाखवायची होती किमया विज्ञानाची

झेपावलं चांद्रयान हेच स्वप्न बाळगून उराशी

त्या पांढऱ्याशुभ्र सुंदर दिसणाऱ्या चंद्राकडे.

निघालं पृथ्वी आणि चंद्रालाही घिरट्या घालत ध्येयाकडे

 मायदेशी मात्र बघत होते डोळ्यात प्राण ओतून बदलणाऱ्या आकड्यांकडे

हळूहळू चंद्र जवळ येऊ लागला आणि वेगही मंदावला क्षणाक्षणाला

इतक्यात कळलं पोहोचलं चंद्रयान शेवटच्या टप्प्याला

आमच्यामध्ये आनंद संचारला, साजरी केली दिवाळी

पण अचानक, चंद्रयेवजी आनंदालाच ग्रहण लागलं

सर्व स्तब्ध झाले अन् आकडेही थांबले

कदाचित विक्रमही चंद्राच्या सौंदर्यावर भाळले असेल,

त्यामुळेच की काय त्याने मायदेशाशी संपर्क तोडला असेल,

मायदेशाशी संपर्क तोडला असेल...........
                     
                                            अंकुश कुमार रौंदळे
                           aroundales@gmail.com

No comments:

Post a Comment

माह्या गावची जत्रा (वर्हाडी कविता)

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात वानखेड तालुका संग्रामपूर ह्या गावात जगदंबा मातेची यात्रा पौष पौर्णिमेला असते. त्या यात्रेचे थोडक्यात वर्हाडी भ...