Search This Blog

Wednesday, February 19, 2020

माह्या गावची जत्रा (वर्हाडी कविता)

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात वानखेड तालुका संग्रामपूर ह्या गावात जगदंबा मातेची यात्रा पौष पौर्णिमेला असते. त्या यात्रेचे थोडक्यात वर्हाडी भाषेत वर्णन


🙏🎂माह्या गावची जत्रा🙏🙏
काय सांगू राजा तुम्हाले माह्या गावचं कौतुक
यात्रेची सुरुवात करते ती जगदंबेची मिरवणूक
डफळे-मृदुंग, लेझीम-पावली गाव दणाणून जाते राजा
त्या डीजे-डॉल्बीत बी नाही अशी मजा
सासरहून माहेरी जाते माझी जगदंबा आई
अशी न्यारी प्रथा साऱ्या जगात नाही
रात्री निघतात सोंगं रामायणावाणी
त्या रात्री सारी रात झपत नाही कोणी
राम, लक्ष्मण, सीता अन असते रामायण सारं
थंडी जाते पवून अन आंगात भरते वार
दहीहंडीची त राजा मजाच न्यारी
थरावर थर लावण्यासाठी पोरं जमतात सारी
भंडारा होते शिस्तीत करत नाही कोणी घाई
त्या उरदाच्या दाईची चव फाईव्ह स्टार मध्ये नाही
कितीबी असो दरवर्षी थंडीची लाट
तरीबी पायतात पंचक्रोशीत पौष पौर्णिमेची वाट
माह्या गावच्या जत्रेत एकदा तरी येजा
जगदंबा मातेचा सोहळा डोये भरून पायजा
                                  अंकुश रौंदळे
                                     वानखेड

माह्या गावची जत्रा (वर्हाडी कविता)

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात वानखेड तालुका संग्रामपूर ह्या गावात जगदंबा मातेची यात्रा पौष पौर्णिमेला असते. त्या यात्रेचे थोडक्यात वर्हाडी भ...